Maharashtra Holi Guidelines: सावधान! धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई होणार
सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा इथं हे नियम लागू असतील.
![Maharashtra Holi Guidelines: सावधान! धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई होणार Maharashtra Dhulivandan Rangpanchami Tourist Banned action taken amid risk of covid19 Maharashtra Holi Guidelines: सावधान! धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/24/5941555467eefc84bdb18e1ccca065d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी तुम्ही पर्यटनस्थळी येत असाल तर ही बातमी अतिशय महत्वाची आहे. कारण, वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी निर्बंध घालण्यात आले आहेत. नियम झुगारल्यास कारवाई केली जाणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी तसे आदेश काढले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण एकत्रित रित्या साजरा करता येणार नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा इथं हे नियम लागू असतील.
कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने देशासह राज्य अनलॉकच्या दिशेने पावलं टाकू लागलं. पण कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने राज्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटू लागले. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे. अशातच होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचे सण साजरा होणार आहेत. त्यामुळेच हे सण साजरा करण्यासाठी अनेकांच्या नजरा पर्यटनास्थळाकडे वळणार, तसे अनेकांनी नियोजन ही करायला सुरुवात केली असावी.
Holi 2021 Celebration Guidelines: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून निर्बंध लागू
हीच सद्यस्थिती पाहता लोणावळ्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होण्याची आणि प्रसंगी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊनच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी निर्बंध घातले आहेत. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे सण एकत्रित येऊन साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागांमध्ये जमण्यास बंदी घातली आहे. नियम झुगारल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Uddhav Thackeray Health: मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह; चिंता वाढली
लॉकडाऊन काळातही नियमांची पायमल्ली करत अनेक पर्यटक लोणावळ्यात वावरत होते. ख्रिसमस ते 31 डिसेंम्बर दरम्यान ही मावळ तालुक्यात नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला होता. त्यावेळी ज्या पर्यटकांनी या नियमांचं उल्लंघन केलं होतं, त्यांना कारवाईला तोंड द्यावं लागलं होतं. त्यामुळे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरा करण्यासाठी तुम्ही लोणावळ्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी येणार असाल तर एकदा नव्हे हजारदा विचार करा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)