एक्स्प्लोर

आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन

राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा  आमचा प्रयत्न असणार आहे, असे अनिल पाटील म्हणाले.

पुणे वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यापैकी पाच  जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं.लोणावळ्यातल्या दुर्घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंदाच्या भरात हे लोक असे पाण्यात जातात आणि घटना होतात , अशी प्रतिक्रिया अनिल पाटील म्हणाले. 

अनिल पाटील म्हणाले,   लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरसात ही घटना घडली आहे. हडपसर येथील लियाकत अन्सारी आणि युनुस खान आणि त्यांचे 17 ते 18 जणांचे कुटुंब वर्षाविहाराकरता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकुण 10 जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले. त्यापैकी पाट जणांना पाण्याचे प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आले परंतु उर्वरीत पाच जण पाण्याचे प्रवाहात वाहून गेले.चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एक व्यक्ती बेपत्ता असून शोध सुरू आहे. राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे.  प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.   वर्षा पर्यटनासाठी जातात आणि आनंदाच्या भरात हे लोक असा पाण्यात जातात आणि अशा घटना घडतात. 

अनोळखी ठिकाणी जाऊन कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका 

या पार्श्वभूमीवर  नागरिकांना आवाहन करण्यात  आले  आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहाराकरता येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहाराकरता येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.तसेच  लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहारा करता येणा-या पर्यटकांनी आपली व आपले कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीसांकडून  करण्यात आले  आहे.

Video : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, दोघे बेपत्ता; कुटुंबातील व्यक्तीने सांगितला थरार

हे ही वाचा :

Lonavala Bhusi Dam: फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
Embed widget