एक्स्प्लोर

Laxman Jagtap Passed Away : धडाडीचा लोकप्रतिनिधी गमावला; लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या  59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धडाडीचा लोकप्रतिनिधी गमावला, अशा शब्दात नेत्यांनी दुख: व्यक्त केलं आहे.

Laxman Jagtap Passed Away: पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap ) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या  59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते. आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने धडाडीचा आणि लोकप्रिय आमदार गमावला, अशा शब्दांत राजकीय नेत्यांनी दुख: व्यक्त केलं आहे. 

Laxman Jagtap Passed Away राजकीय प्रतिक्रिया

सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले.मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना, अशा शब्दातं मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी लक्षण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान : देवेंद्र फडणवीस 

पिंपरी-चिंचवडच्या विकासात लक्ष्मण जगताप यांचं मोलाचं योगदान होतं. पक्षाशी त्यांची घनिष्ठ निष्ठा होती. आजारी असतानाही मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रुग्णवाहिकेने ते आले. त्यांच्या जाण्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

लक्ष्मण जगताप यांचं जाणं चटका लावणारं : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचं निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तुपाठ होते. बरे होतील असं वाटतानाच त्यांचं असं जाणं चटका लावणारं आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत, अशा शब्दांत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

धडाडीचा लोकप्रतिनिधी गमावला : अजित पवार 

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शब्दाच अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

लोकप्रिय नेतृत्व गमावलं : सुप्रिया सुळे

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक पद, महापौर पद भूषवले. त्यांनी स्थानिक स्वराज्यसंस्थातून विधानपरिषदेत त्यानंतर विधानसभेतही त्यांनी आमदार म्हणून काम केलं. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील नागरिक एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला कायमचे मुकले आहेत. मी आणि माझे कुटुंबीय जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. 

लक्ष्मण जगताप यांची पक्षनिष्ठा सदैव स्मरणात राहिल : मुरलीधर मोहोळ

पक्ष निष्ठेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात असलेले त्यांचे योगदान आणि त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहिल, अशा शब्दात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

संबंधित बातम्या-

Rajya Sabha Election 2022 : आजारी असल्याने आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी अॅम्ब्युलन्सने मुंबईत येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut : मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणाSahil Khan Arrest : साहिल खानला महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अटकLok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP MajhaSushma Andhare Vs Aditi Tatkare :4 जूनला आमच्यासोबत गुलाल खेळा, अदिती तटकरेंचं अंधारेंना प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar : मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Embed widget