एक्स्प्लोर

Laxman Hake: 'लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं'; रुग्णालयाकडून क्लीनचिट, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

Laxman Hake: गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे.

Laxman Hake OBC पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मद्यप्राशन करुन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मी मद्यप्राशन केलं की नाही पोलीस बघून घेतील. मात्र मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. यानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली. 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल-

ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचिट मिळाली. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता लक्ष्मण हाके हे नागपुरला एका कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे, या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याचे दिसत आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचं दिसतंय. यानंतर लक्ष्मण हाके तात्काळ पोलिसांसोबत ससून रुग्णालयात पोहचले. लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे. तर मराठा आंदोलकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. 

संभाजीराजे, तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते- हाके

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण सुरू असताना त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली होती. त्यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "संभाजीराजे, तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही." संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच पुण्यातील ही घटना घडली असल्याची माहिती आहे. 

संबंधित बातमी:

VIDEO : लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले; हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा, मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget