एक्स्प्लोर

Pune Crime news : ललित पाटील प्रकरण: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची कसून चौकशी सुरु; डॉक्टरांचीही चौकशी होणार

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सध्या ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर 16 मधील क्लार्क आणि नर्स यांची चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून ही चौकशी करण्यात येत आहे

पुणे : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सध्या (Lalit Patil Drug Case)  ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर 16 मधील क्लार्क आणि नर्स यांची चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून ही चौकशी करण्यात येत आहे. ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात हे क्लार्क आणि नर्स प्रयत्नशील होते का?, त्यांनी ललिच पाटीलला कोणत्या प्रकारची मदत केली आहे का? याची सध्या चौकशी करण्यात येत आहे. 

पुणे पोलिसांचा रोख हा ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर केंद्रीत झाला आहे. ललित पाटीलच्या मुक्कामासाठी नक्की कोण प्रयत्न करत होते? आणि ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? ही माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे. त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात ससूनमध्ये काम करणाऱ्या क्लार्क महेंद्र शिवटे यांचं नाव सातत्याने समोर येत आहे. शिवटे हे कैद्यांना कुठे आणि किती दिवस ठेवायचं यात सहभागी असतात त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. 

सगळ्या डॉक्टरांची चौकशी होणार...

या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. त्या चौकशीत ससूनचे डीन संजीव ठाकूर हे दोषी आढळल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आलं आहे तर डॉ. देवकाते आहे त्यांंचं निलंबन करण्यात आलं आहे. आता क्लार्क आणि नर्सेसची चौकशी करण्यात येत आहे. मात्र ही चौकशी इथेच थांबणार नसून वॉर्ड नंबर 16 मध्ये कार्यरत असलेल्या सगळ्याच डॉक्टरांची चौकशी होणार आहे. ससूनचा X-Ray विभागातील सगळ्यांची चौकशी होणार आहे. X-Ray  काढण्यासाठी 2 ऑक्टोबरला ललित पाटीलला 16नंबर वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याचदरम्यान तो पळाला होता. त्यामुळे X-Ray विभागातील सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. 

ससून रुग्णालयाला ललित पाटीलची धास्ती?


ड्रग्स माफिया ललित पाटील याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार देत आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाहीत.ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांवर संशय होता. त्यानंतर या दोघांनीही ललित पाटीलला मदत केल्याचं पुढे आलं. त्यानंतर अनेक जणांवर संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं. ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं आणि डॉ. देवकाते यांना निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणानंतर आता ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भर्ती करुन घेत नाही आहे. त्याच्यावर उपचार करुन त्याला परत पाठवण्यात येत आहे.  

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime news : शाळेतून घरी निघाला, रस्त्यात बांधकामावरील सळई डोक्यात पडली; हसत्या खेळत्या नऊ वर्षाच्या मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget