Pune Crime news : शाळेतून घरी निघाला, रस्त्यात बांधकामावरील सळई डोक्यात पडली; हसत्या खेळत्या नऊ वर्षाच्या मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना
बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
![Pune Crime news : शाळेतून घरी निघाला, रस्त्यात बांधकामावरील सळई डोक्यात पडली; हसत्या खेळत्या नऊ वर्षाच्या मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना Pune Crime news Nine year old boy dies after being hit by a iron road in Ganraj Chowk Baner Pune Crime news : शाळेतून घरी निघाला, रस्त्यात बांधकामावरील सळई डोक्यात पडली; हसत्या खेळत्या नऊ वर्षाच्या मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/1107ed45ea2d577ea09c9bb5efe0cabf1700717306377442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी (Pune Crime news) जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घरातील हसत्या खेळत्या 9 वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रुद्र केतन राऊत असं या मुलाचं नाव आहे.
बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या काम सुरू असताना या बिल्डिंग वरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-९) याच्या डोक्यात सगळी पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये या संदर्भात बिल्डर आणि साईड इंजिनिअरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी मोठमोठे बांधकाम सुरु आहे. त्यात बाणेर बालेवाडी परिसरात तर मोठ्या टोलेजंग इमारतींचं बांधकाम सुरु आहे. मात्र हेच बांधकाम सुरु असताना बिल्डरक़डून खबरदारी घेतली जात नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आतापर्यंत पुण्यात अनेक कामारागांचा खबरदारी न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बिल्डरचा हलगर्जीपणा वारंवार समोर आला आहे. त्यात आता लहानग्याचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बिल्डरचा हलगर्जीपण जीवावर बेतला...
काही दिवसांपूर्वी काम करताना पाय घसरुन इमारतीच्या डक्टमध्ये (Pune crime) पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. सुरक्षेची कोणतीही साधने न वापरल्याने ही घटना घडली होती. मरिअप्पा मल्लय्या वनकेरी असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला होता.
ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमधील द्वारिकाधाम सोसायटीतील चालू असलेल्या इमारतीच्या साईटवर घडली होती. साहेबराव मल्लय्या रामोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार मुकुंद हनमंतराय रेड्डी आणि बिल्डर राहुल नावंदर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. वारंवार घ़डत असलेल्या या घटनांमुळे बिल्डर्सला हलगर्जीपणा सातत्याने समोर आला आहे आणि गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)