एक्स्प्लोर

मजुरांच्या गावी परत जाण्याने बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची व्यावसायिकांना भीती

कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेरील बांधकाम प्रकल्पांचं काम सुरु करायला काही अटी आणि शर्ती घालून सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, मजुरांपासून अनेक अडचणींचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे.

पुणे : कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेरील बांधकाम प्रकल्पांचं काम सुरु करायला काही अटी आणि शर्ती घालून सरकारने परवानगी दिली. पण हे सुरु होताना अनेक अडचणी येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या नेमक्या अडचणी समजून घेण्यासाठी बांधकाम व्यानसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका भागातल्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच पीएमआरडीए भागातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला. एकूण 216 व्यावसायिकांनी यात सहभाग घेतला.

या सर्व्हेक्षणामधून विविध मुद्दे पुढे आले. पण क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने सगळ्यात जास्त चिंता व्यक्त केली गेली ती मजूर परत गावी जाण्याची. ज्या व्यावसायिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला त्यांच्याकडे आजच्या घडीला बांधकाम प्रकल्पावर उपलब्ध मजूर (जे साईटवर राहत आहेत) संख्या ही 45 हजार 700 इतकी आहे. तर सर्वेक्षणानुसार पुणे आणि परिसरातील 46% टक्के मजूर काम नसल्याने गावी परतण्याच्या तयारीत आहे. जर हे मजूर परत आपल्या गावी गेले तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल असं क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितलं. सरकारने तातडीची पावले उचलत या सर्व मजुरांना आश्वस्त करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. बांधकाम प्रकाल्पांवर राहणाऱ्या मजुरांना अनेक संस्थांनी मदत केली. पण कित्येक दिवस काम बंद असल्याने मजुरांमध्ये अस्वस्थता असल्याचं मर्चंट यांनी सांगितलं.

यासोबतच बांधकाम साहित्याची उपलब्धता, साहित्य प्रकलपाच्या ठिकाणी पोहोचविण्याकरिता येणाऱ्या अडचणी, स्थापत्य- अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरु असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा समस्या या सर्वेक्षणातून मांडल्या आहेत.

क्रेडाई पुणे मेट्रोने केलेल्या या सर्व्हेक्षणातील मुद्दे

  • या सर्व्हेक्षणामध्ये पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील तब्बल 216 विकासकांनी सहभाग घेत त्यांना येणा-या समस्यांविषयी माहिती दिली.
  • या सर्व जणांकडे आजच्या घडीला बांधकाम प्रकल्पावर उपलब्ध मजुरांची संख्या ही तब्बल 45 हजार 700 इतकी आहे.
  • सर्व्हेक्षणानुसार पुणे व परिसरात असलेल्या एकूण मजुरांच्या संख्येपैकी 46% मजूर हे काही काम नसल्यामुळे घरी परतण्याच्या तयारीत आहेत.
  • लॉकडाऊन मधील नियम व अटीमुळे बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी काम करण्यासाठी येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांपैकी 20% हून कमी कर्मचारी हे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचू शकले. प्रशासनाकडून मिळालेल्या आदेशासंदर्भात स्पष्टता नसणे, ई पासेस उपलब्ध नसणे व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मिळणारी वागणूक ही या मागील काही कारणे आहेत.
  • एकूण विकसकांपैकी 90% विकासकांना आपले प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी साहित्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे.
  • गेल्या काही दिवसांत 10% हून कमी व्यवसायिकांना हे साहित्य उपलब्ध होऊ शकले आहे.
  • निम्म्या बांधकाम व्यवसायिकांच्या (216 विकासकांपैकी 105 ) प्रकल्प साईट्सवर आज 100 हून कमी मजूर उपलब्ध आहेत.
  • तर 3% हून कमी बांधकाम व्यवसायिकांच्या चालू प्रकल्पांवर 1 हजार पेक्षा जास्त मजूर उपलब्ध आहेत.
  • बहुसंख्य विकासक हे स्थानिक प्रशासन व पोलीस यांकडून मिळालेल्या आदेशांमध्ये समन्वय व स्पष्टता नसल्याने गोंधळलेले आहेत.
  • पेट्रोलची उपलब्धता नसल्याने बांधकाम प्रकल्पावरील कर्मचारी, तपासणीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि ठेकेदारांकडून काम करणारे कर्मचारी यांना प्रकल्पाच्या ठिकाणी येणे शक्य होत नाहीये.
  • जिल्हाबंदी असल्याने लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावी गेलेले वरिष्ठ अभियंते पुणे, पिंपरी चिंचवड शहरात परत येऊ शकत नाहीयेत.
  • मान्सूनपूर्व कामासाठी ठराविक मजुरांना आणण्यासाठी एक वेळेची परवानगी देण्यात आली नाहीये.
  • ग्रामपंचायती व पोलीस यांकडून बांधकाम मजुरांना आरोग्य तपासणीच्या नावाखाली भीती घालण्यात आहे.
  • आरएमसी प्रकल्प बंद असल्याने अनेक ठिकाणी कॉंक्रिटीकरण करता येणे शक्य नाहीये.
  • आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या वस्तू बांधकाम प्रकल्पावर पोहोचू शकत नसल्याने सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबाजावणी करण्यास अडचणी येत आहेत.
  • बँकांनी पतपुरवठा करणे थांबविले असून यामुळे एक आव्हान उभे राहिले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 14 March 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषदEknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्तीABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Embed widget