अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार.
अक्षर पटेल आतापर्यंत 150 आयपीएल सामने खेळला आहे.
सुमारे 131 च्या स्ट्राइक रेटवर 1653 धावा केल्या आहेत.
त्याने 7.28 च्या सरासरीने 123 विकेट घेतल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्स नुसार के. एल. राहुलला कॅप्टनपद देण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा विचार होता. मात्र, केएल राहुलनं ती ऑफर नाकारली होती.
यामुळं दिल्ली कॅपिटल्सनं अक्षर पटेलला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.
अक्षर पटेलला कर्णधारपदाचा अनुभव नाही.
अक्षर पटेल 7 हंगाम दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून खेळला आहे.
टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलवर कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असावी.