एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे
पुणे : नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या पीएमपीएमल व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला. कर्मचाऱ्यांनी टी शर्ट आणि जीन्स वापरु नये, अशी सक्त ताकीद मुंढेंनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली.
मुंढे मास्तरांनी कामाच्या वेळा बदलल्या !
तुकाराम मुंढे यांनी पदाची सूत्रे स्वीकाराताच अधिकाऱ्याची बैठक घेऊन पीएमपीएमलमधील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची पूर्वीची साडे दहा ते साडे पाच या वेळेत बदल करून पावणे दहा ते पावणे सहा अशी वेळ केली. या त्यांच्या आदेशाने मुंढे मास्तरानी पहिल्याच दिवशी येऊन ऑफिसची वेळ बदल्याची चर्चा अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये ऐकण्यास मिळाली.
"धुम्रपान करता कामा नये"
तसेच यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आधिकारी वर्गाकडून माहिती देण्यात आली. तर या बैठकीमध्ये तुकाराम मुंढे म्हणाले की, कोणत्याही कर्मचायांने इतर ऑफिसमध्ये कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनचा वापर करा, अशा सूचना करीत ते पुढे म्हणाले, धूम्रपान करता कामा नये. तसे करता आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
कार्यलयात रुजू होण्याची वेळ, जेवणाची वेळ, कार्यलय बंद होण्याची वेळ असं सविस्तर पत्रक काढून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय कार्यलयं, डेपो आणि सर्व सेंट्रल वर्कशॉप्सना हे आदेश लागू होणार आहेत.
टापटीप राहा!
कार्यलयीन वेळेसोबतच कार्यालयातील पेहराव आणि शिस्तीचेही धडे देण्यात आले आहेत. कार्यलयात कामा करत असताना आपापलं ठिकाण सोडून इतरत्र जाऊ नये, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित गणवेश परिधान करावा, केस व दाढी यांचा टापटीपणा व्यवस्थित असावा, चालक आणि वाहक गणवेशातच असावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, यांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कामावर हजर न राहिल्यास, त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार येईल, असे बजावण्यात आले आहे.
पीएमपीएमलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तुकारा मुंढे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.
नवी मुंबई आयुक्तपदावरुन बदली
तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरुन पीएमपीएमएलच्या सीएमडीपदी बदली करण्यात आली आहे.
मात्र तुकाराम मुंडे हे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता त्यांनी तो स्वीकारला आहे.
जुलै 2016 मध्ये अभिषेक कृष्णन यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर पीएमपीएमएलचं अध्यक्षपद रिकामं होतं.
सप्टेंबर 2016 मध्ये धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभार न स्वीकारल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतील कारकीर्द
नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची बदली टाळली होती.
25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर भाजपने ठरावाच्या विरोधात म्हणजेच मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.
महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.
यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement