Devendra Fadnavis and Eknath Khadse : जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री, VIP कक्षात बसले, चर्चांना उधाण
Devendra Fadnavis and Eknath Khadse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली.

Devendra Fadnavis and Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अनेक दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. त्यामुळे एकनाथ खडसे नक्की भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? असा चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांनी खळबळजनक दावा केला होता. भाजपमध्ये (BJP) जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटातच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातच शुक्रवारी (दि. 20) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले होते. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला दाखल झाले. या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री
देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत आज खडसेंच्या भाजप प्रवेशावर चर्चा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जळगावातील कार्यक्रमात एकनाथ खडसे दाखल झाले. मात्र, एकनाथ खडसे हे व्यासपीठावर न जाता ते व्हीआयपी कक्षात बसल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार : एकनाथ खडसे
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, माझा भाजप पक्ष प्रवेशाचा विषय हा केव्हाचा संपला आहे. मी त्याला पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
आणखी वाचा
























