HSRP Number Plate: सावधान! HSRP नंबर प्लेट काढताना तुम्हाला गंडा घातला जातोय; पिंपरी चिंचवड सायबर विभागाने दिली महत्त्वाची माहिती
HSRP Number Plate: तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्ही काय खबरदारी घ्यायला हवी, याची माहिती पिंपरी चिंचवड सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे यांनी दिली आहे.

पुणे: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सध्या करोडो वाहन चालक एचएसआरपीची ऑनलाईन नोंदणी करण्यात व्यस्त आहेत. याचाच फायदा घेत अनेक ठग आता तुम्हाला ऑनलाईन गंडा घालण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे अशा तक्रारी ही प्राप्त झाल्या आहेत. यासाठी अनेक ठगांनी शासकीय वेबसाईटला साधर्म्य असणाऱ्या बनावट वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्या वेबसाईटवरुन तुम्ही एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी केली, तर त्याद्वारे तुमचं नोंदणी शुल्क हडपले जात आहे. नेमका हा काय प्रकार आहे आणि तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्ही काय खबरदारी घ्यायला हवी, याची माहिती पिंपरी चिंचवड सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, शासनाने वाहनांच्या सुरक्षेसाठी 2019 पूर्वीच्या वाहनांना उच्च दर्जाची सुरक्षा मिळावी म्हणून ही सिस्टीम आणलेली आहे आहे. काही लोक जी वेबसाईट आहे ती न सर्च करता बुक माय नंबरप्लेट, HSRP नंबरप्लेट अशाप्रकारे त्या नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करत आहेत आणि त्यामध्ये लोकांची फसवणूक होत आहे. आमच्याकडे आत्तापर्यंत दोन ते तीन तक्रारी आलेले आहेत. त्यामध्ये लोकांची दीड हजारापासून ते 3000 पर्यंतची फसवणूक झालेली आहे. ज्यावेळी त्यांच्या पैसे बँकेतून कट होतात आणि त्यांना बुकिंग संदर्भात किंवा ती नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात कोणतीच डेट मिळत नाही त्यावेळेस लोकांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पिंपरी चिंचवड पोलिसांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या वाहनाची रजिस्ट्रेशन करताना जी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि त्यानुसार आपली नंबर प्लेट बदलून घ्या.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. . त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.
01. त्यासाठी तुम्हाला गुगलवर HSRP Number Plate Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा..
02. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल...
03. आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे.
04. त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं... त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक ..इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक.. आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे.. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल.
त्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पेमेंट करावं लागेलं.
दुचाकी, ट्रॅक्टर - 450
तीनचाकी - 500
चारचाकी, अन्य वाहने -745
ही प्रोसेस करून तुम्ही ऑनलाईन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला Apply करू शकता..
























