शनिवारवाड्यातील कार्यक्रमाला हायकोर्टाने परवानगी नाकारली
शनिवार 12 जानेवारी रोजी पुण्यातील शनिवार पेठ येथ आयोजित केलेल्या जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार होते.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. मात्र पोलीस प्रशासनाने ही परवानगी नाकारताना दिलेल्या कारणांवर बोट ठेवत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आयोजकांवर आता ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर पर्यायी जागा शोधण्याची वेळ आली आहे.
शनिवार 12 जानेवारी रोजी पुण्यातील शनिवार पेठ येथ आयोजित केलेल्या जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार होते. सकाळी 11 ते रात्री 10 दरम्यान रंगणाऱ्या या कार्यक्रमात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
याच कार्यक्रमात न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारित एका परिसंवादाचंही आयोजन करण्यात आलं होत. मात्र या कार्यक्रमामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण पुढे करत पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.