एक्स्प्लोर
Advertisement
सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम
मुंबईतून बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक करत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सकाळपासून संथगतीने सुरु आहे.
मुंबई : सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. मुंबईतून बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक करत आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सकाळपासून संथगतीने सुरु आहे. लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. तर हिच परिस्थिती मुंबई-गोवा महामार्गावर आहे.
पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम आहे. वाहतूक संथगतीने सुरु असल्याने प्रवासाचा वेग मंदावला आहे.
पर्यटकांनी कोकणचा पर्याय निवडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग सकाळपासून जाम आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव इथे सकाळी जवळपास चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाली. ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे.
28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 (सोमवार) एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे (मंगळवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.
संबंधित बातम्या :
शनिवारपासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी!
वीकेंडचा प्लॅन करताय? राज्यातली ही सुंदर ठिकाणं पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement