Sharad Pawar Speech : लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल पंतप्रधान मोदींचं अंत:करणापासून अभिनंदन : शरद पवार
Sharad Pawar Speech : "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड झाली, यासाठी मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Sharad Pawar Speech in Lokmanya Tilak Award : "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड झाली, यासाठी मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award) गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
'नरेंद्र मोदींचं अंत:करणापासून अभिनंदन'
शरद पवार म्हणाले की, "टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जातील. या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला याचा सर्वांना आनंद झालं. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.
'टिळकांचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल याची खात्री'
"टिळकांनी 25 व्या वर्षी मराठी केसरी वृत्तपत्र आणि इंग्रजीत मराठा साप्ताहिकाची सुरुवात केली. केसरी आणि मराठाद्वारे टिळकांनी या देशातील परकीय लोकांवर प्रचंड प्रहार केले आणि लोकजागृती करण्याचं काम केलं. पत्रकारितेवर दबाव असता कामा नाही, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी पाळली. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म पुण्यात झाला. त्या काळात दोन गटाचे नेते संघटनेत होते ज्यांना मवाळ आणि जहाल म्हणून ओळखले जायचे. जहालांचं नेतृत्त्व लोकमान्यांनी केलं होतं. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका जनमानसात मांडली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री मांडली आणि त्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचं आंदोलन त्यांच्या काळात मांडलं. गणेशोत्सव, शिवजयंती असेल यातून लोकमान्याचं योगदान मोठं होतं. त्या कालखंडात दोन युग होती, एक टिळक युग आणि एक महात्मा गांधींचं युग. दोघांचं योगदान आम्ही विसरु शकत नाही. या देशाच्या नव्या पिढीला कर्तृत्ववान नेत्याचा आदर्श हा अखंडपणे प्रेरणा देईल याची मला खात्री आहे, असं शरद पवार पुढे म्हणाले.
लोकमान्य टिळक पुरस्कारचे आतापर्यंतचे मानकरी
1983 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जाणून घेऊन या पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी...
गोदावरी परुळेकर
इंदिरा गांधी (मरणोत्तर)
श्रीपाद अमृत डांगे
अच्युतराव पटवर्धन
खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)
सुधाताई जोशी
मधु लिमये
बाळासाहेब देवरस
पांडुरंगशास्त्री आठवले
शंकर दयाळ शर्मा
अटलबिहारी वाजपेयी
टी. एन. शेषन
डॉ. रा. ना. दांडेकर
डॉ. मनमोहन सिंग
डॉ. आर. चिदम्बरम
डॉ. विजय भटकर
राहुल बजाज
प्रा. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
रामोजी राव
एन. आर. नारायण मूर्ती
सॅम पित्रोदा
जी. माधवन नायर
डॉ. ए. सिवाथानू पिल्लई
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रणब मुखर्जी
शीला दीक्षित
डॉ. कोटा हरिनारायण
डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे
डॉ. ई. श्रीधरन
डॉ. अविनाश चंदेर
सुबय्या अरुणन
शरद पवार
आचार्य बाळकृष्ण
डॉ. के. सिवन
बाबा कल्याणी
सोनम वांगचूक
डॉ. सायरस पूनावाला
डॉ. टेस्सी थॉमस
हेही वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात...