Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात? राजकीय वर्तुळातील चर्चेवर म्हणाले, 'आतापर्यंत तुतारीच्या कुठल्याही नेत्यांनी...'
Harshvardhan Patil: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेवरती आज हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे काही नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच भाजपचे कोल्हापूरचे नेते समरजित घाटगे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेवरती आज हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. माझा कोणाशीही संपर्क झालेला नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हेच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर, अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालं नसल्याचा हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे म्हणणे तर इंदापुरात हर्षवर्धन पाटील तुतारीच्या चिन्हावरती लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेला आहे. या चर्चांना हर्षवर्धन पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. आतापर्यंत तुतारीच्या कुठल्याही नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, आज वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा दिल्य, कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जनमानस आपल्याबद्दल काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असतं. 1995 ते 2014 पर्यत लोकांनी खूप प्रेम दिलं. दोन निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला आहे. दाबावाचे राजकारण इथं चालत नाही. इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात होते आहे. कार्यकर्ते आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत. आम्ही लोकसभेत चांगले आणि विधानसभेमध्ये वाईट असतो, हे आत्तापर्यंत 6 वेळा झालं आहे.आम्ही प्रत्येक वेळी काम केलं पण विधानसभा आली काय होतं हे समजत नाही, राजकारणामध्ये स्थिरता हवी असते, लोकांना हे आवडत नाही असंही पाटील (Harshvardhan Patil) पुढे म्हणाले आहेत.
हे सर्व नेत्यांच्या कानावर घातलं आहे. 8 विधानसभेला नेत्याला टार्गेट केलं जातंय का? असे कार्यकर्ते विचारतात. आधी लोकसभा आणि आता विधानसभा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क साधला नाही. विधानसभा निवडणुकीसाठीचे अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप झालेले नाही. पण आमच्यातले काही मित्र पक्षांचे लोक म्हणतात की, ही जागा सीटिंग आमदाराला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जी चर्चा झाली त्यावर नेत्यांना कॉल घ्यावा लागेल. कोणताही पक्ष जनतेच्या मनात काय चालत हे ओळखतो त्यावर चालतो, आतापर्यंत तुतारीच्या कुठल्याही नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही, असंही पुढे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी म्हटलं आहे.