(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harshvardhan Patil: काल तुतारी हाती घेण्याची चर्चा, आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू असतानाच आज शरद पवार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar)आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चर्चा सुरु आहे. या भेटीवेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे. या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar)यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात . अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूरचे प्रशांत परिचारक , इंदापूरचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) , पुण्यातील बापू पाठारे , भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील (Pune Political News) इंदापूरमधून अजित पवारांच्या (Ajit Pawar)पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत . हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत.