एक्स्प्लोर

Pune-Indapur News: हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकाच मंचावर; अनेक विषयांवरुन एकमेकांवर हल्ला बोल

भाजप नेते हर्षवर्धन पाटील,  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकाच मंचावर होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर हल्लाबोल केला.

Pune-Indapur News: भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा भाजप आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाला असल्याचे वारंवार सूचित केले व चाललेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा हा उत्तमरीत्या करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच त्यांनी भरला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग टप्पा क्रमांक दोन वरती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते.

केंद्रात व राज्यात आता आपली सत्ता असल्याचे सांगत पाटील यांनी यावेळी कार्यक्रमात अधिकारी वर्गांना खडे बोलत सुनावले. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मंत्रीपद हे मिरवायला नसते तर जनतेची कामे करावे लागतात. मी तालुक्याचा आमदार आहे आणखी जास्त विकास निधी आणून तालुक्याचा कायापालट करणार असल्याचे यावेळी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील,  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकाच मंचावर होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या सगळे निर्णय घेत आहेत. मंत्रीपद मिळाल्यावर जनतेची कामं करावे लागतात. आज मी मंत्री नाही आहे मात्र अनेकांनी म्हटलं पाहिजे की दत्तात्रय भरणे यांनी रस्ता केला. उपाययोजना राबवल्या. गल्ली पासून सगळीकडे विकास केला अशी आपल्या पदाची नोंद झाली पाहिजे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषणKamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवासAvinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमकMumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
Embed widget