Pune Bhide wada News : भिडे वाड्याचं स्मारक होणार? चंद्रकांत पाटलांनी थेट भिडे वाड्याच्या जागेच्या मालकाची घेतली भेट
पुण्याच्या भिडे (pune) वाड्याचा स्मारकाचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून भिडे (bhide wada) वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, अशी मागणी केली जात होती.
Pune Bhide wada News : पुण्याच्या भिडे (pune) वाड्याचा स्मारकाचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून भिडे (bhide wada) वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, अशी मागणी केली जात होती. ही मागणी मान्यदेखील झाली. मात्र जागेचा प्रश्न सातत्त्याने समोर येत होता. त्यामुळे भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.
भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री पाटील हे आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी महाधिवक्त्यांना केली होती.
स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : विजय ढेरे
त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तिथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनाला ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरु यांच्याशी चर्चा करुन सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.
राज ठाकरेंचीही मागणी
पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अनेक नेत्यांनी आतापर्यंत या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. त्यांनी पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.