आजोबा-वडिलांचा 'कार'नामा; चिमुकलीचा हट्ट पुरवण्यासाठी 4 महिन्यात मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती
पिंपरी चिंचवडमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती करण्यात आली आहे. आजोबा आणि वडिलांनी लॉकडाऊनच्या चार महिन्यात ही किमया साधली आहे.
पिंपरी-चिंचवड : एका सहा वर्षीय चिमुरडीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती करण्यात आली आहे. आजोबा आणि वडिलांनी लॉकडाऊनच्या चार महिन्यात ही किमया साधली आहे. आजोबा आणि वडील जुन्या गाड्या मॉडीफाय करून देतात. त्यामुळे मुलीचा हट्ट मेड इन चायना कारऐवजी मेड इन इंडिया कारची निर्मिती करून पूर्ण केला.
पिंपरीतील सहा वर्षीय मुलगी तंजीलाने मेड इन चायना कारचा हट्ट धरला.अशातच कोरोनाने भारतात शिरकाव केला, देश लॉकडाऊन झाला. दुसरीकडे सीमेवर चीनने कुरघोडी सुरू केली, त्यामुळे चीनबद्दल भारतात संतापाची लाट उसळली. मग मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी बाप आणि आजोबाने मेड इन चायनाला फाटा दिला आणि मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती केली.
हसन आणि जावेद शेख या बाप-लेकाने या विंटेज कारची निर्मिती केली आहे. सहा वर्षीय मुलगी तंजीलाने मेड इन चायना कारचा हट्ट धरला. तितक्यात चीनमधून उसळलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला. दुसरीकडे सीमेवर ही चिन्यांनी कुरघोड्या केला. यामुळे संतापलेल्या बाप आणि आजोबाने मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मेड इन चायना कारला लाथाडले आणि मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती केली. घरात धूळ खात पडलेल्या स्कूटीचे इंजिन या कारसाठी वापरण्यात आलं. गाड्या मॉडीफाय करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने, बाप-लेकाने जुगाड केला आणि बघता-बघता लॉकडाऊनमध्येच भारतीय बनावटीची कार तयार झाली. तंजीलाने ज्या मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला होता. त्याहून सरस ती ही मेड इन इंडिया कार तिला मिळाली. त्यामुळं हे कुटुंबीय भलतंच आनंदात आहे.
भारतात चीनमुळं कोरोनाने शिरकाव केलेला असताना, सीमेवर ही चीनने कुरघोडी सुरूच ठेवली. हा राग प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. यातूनच चीनला भारतातून हद्दपार करण्याचा नारा देण्यात आला. पण हा नारा शेख कुटुंबियांप्रमाणे प्रत्येकाने कृतीत उतरवला तरच खऱ्या अर्थाने चीनला भारतातून हद्दपार करण्याचं स्वप्न सत्यात उतरेल.