(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule In Pune: महागाईच्याबाबतीत सध्याचं सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा
महागाईच्या विषयात सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
Supriya Sule In Pune: महागाईच्या विषयात सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्यांनी आज पुण्यात महागाई विरोधात असलेल्या आंदोलनात हजेरी लावली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. या महागाईचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार यावर पावलं उचलताना दिसत नाही आहे, असंदेखील त्या म्हणाल्या.
महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य आणि मध्यमर्गीयांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही लोकसभेत देखील यावरुन आवाज उठवला आहे. धान्य मोफत दिलं असं सरकार वारंवार सांगत आहे. त्यासाठी सरकारचे आभार माना असं देखील अनेक नेते सांगत आहे. आधी गरीबाला आधी गरीबाला धान्य द्यायचं आणि नंतर आभार मानायला लावायचं. या सरकारमध्ये किती मस्ती आहे बघा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी केंद्रसरकारच्या विरोधात घेतली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या एक महिला आहे. त्यांनी तरी या महागाईचा विचार करायला हवा. घरातील गृहिणीचा विचार करायला हवां. दरवेळी लोकसभेत या विषयांवर सातत्याने चर्चा होतात. मात्र त्यावर काहीही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. त्यासाठी त्यांची तयारी देखील नाही. या सरकारला माणसाच्या वेदना कळत नाहीत. सामान्य लोकांचे होणारे हाल आणि त्यांच्या वेदना सरकारला लक्षात येत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
एखादं पद मिळाल्याने माणूस बदलत नाही
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतरचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा एक जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली. त्यावरदेखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाकिस्तान सामना प्रत्येक भारतीयांसाठी स्पेशल असतो. आम्ही देखील सामान्य लोक आहोत. सामान्य आयुष्य जगतो. एखादं पद मिळाल्याने माणूस बदलत नाहीस असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.