एक्स्प्लोर

Praful Lodha: पतीला नोकरी लावण्याचं आमिष अन् तिची नोकरी घालवण्याची धमकी; हायवेवरील हॉटेलमध्ये...पुण्यात प्रफुल लोढाच्या काळ्या कारनाम्यांनी संताप, मुंबई पोलिसांकडून पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू

Praful Lodha: याप्रकरणी बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी माहिती दिली आहे. प्रफुल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे:  हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल लोढाच्या विरोधात बावधन पोलिसांनी (Pune Crime News) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका 36 वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याच्या अमिषाने प्रफुल लोढाने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. 27 मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये प्रफुल लोढाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी माहिती दिली आहे. प्रफुल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.(Pune Crime News)

जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार 

बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधान पोलिस स्टेशनच्या हद्दीत 17 जुलै रोजी प्रफुल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे, आरोपी सध्या मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात इकडे ट्रान्सफर करून आणण्याची  प्रक्रिया सुरू आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीला नोकरी लावतो असं आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार आहे. तिच्या पतीला नोकरी लावतो असं सांगून तिच्याशी संबंध ठेवले त्याचबरोबर संबंध ठेवण्यासाठी साथ दिली नाही तर तिची नोकरी देखील घालवण्याची धमकी लोढाने तिला दिली होती, तक्रारदार महिला ही घरामध्ये एकटीच कमावती आहे, आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे. ही घटना 27 मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घडली आहे. घटनेचा तपास सुरू आहे, घटना इतक्या उशीरा तक्रार का दिली याबाबतचा तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

'हनी ट्रॅप'सह एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काम देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानंतर आता  पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रफुल्ल लोढा (वय 62, रा. जामनेर, जि. जळगाव) याच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 3 जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 'पोस्को 'सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी लोढा याला 5 जुलै रोजी अटक केली आहे. आता त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा - Mumbai Crime News: गिरीश महाजनांचा एकेकाळचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात; पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल, नोकरी देण्याच्या अमिषानं अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Maharashtra Budget 2026: मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget