एक्स्प्लोर

Mumbai Crime News: गिरीश महाजनांचा एकेकाळचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात; पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल, नोकरी देण्याच्या अमिषानं अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

Mumbai Crime News: प्रफुल लोढा हे नेहमीच वादग्रस्त राहिल्याने ते राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय राहिले आहे. भाजपामध्ये असले तरी राजकारणात फारसे सक्रिय नसताना त्यांच्यावर मुंबईमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चचा विषय बनले आहे.

जळगाव: एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आरोग्यदूत म्हणून काम करणारे आणि भाजपचे कार्यकर्ता राहिलेले प्रफुल लोढा यांच्यावर मुंबईमध्ये साकीनाका पोलिस ठाण्यात पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या सूत्रांच्या माहिती आहे, ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. सध्या राज्यभर हनीट्रॅप विषय गाजत असून त्याची पाळेमुळे ही नाशिक, जळगावपर्यंत पोहोचली असल्याचं सांगितले जात आहे.

नोकरी देण्याच्या आमिषाने मुलीवर अत्याचार केला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथील व्यापारी प्रफुल लोढा हे मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत चकाला येथील लोढा हाऊसमध्ये आढळून आले होते, नोकरी देण्याच्या आमिषाने त्यांनी सदर मुलीवर अत्याचार केला, या प्रकरणात मुंबईमधील अंधेरी आणि साकीनाका पोलिसात प्रफुल लोढा विरोधात गुन्हा करण्यात आला असून, 5 जुलै रोजी त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, लोढा यांच्या पहूर येथील घराची झडती घेऊन काही वस्तू आणि दस्त ऐवज ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपाला रामराम करत वंचितमध्ये नंतर...

भाजपामध्ये अनेक वर्ष काम करत असताना मागील पंचवार्षिकमध्ये त्यांनी भाजपाला रामराम करत वंचित बहुजन आघाडी कडून आपली उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी निवडणूक न लढता माघार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपा दोन वर्ष दूर राहिल्यानंतर पुन्हा त्यांनी भाजपाशी जुळून घेत भाजपामध्ये प्रवेश केला होता,मात्र त्यांच्याकडे कोणतेही पद देण्यात आले नव्हते, प्रफुल लोढा हे नेहमीच वादग्रस्त राहिल्याने ते राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय राहिले आहे. भाजपामध्ये असले तरी राजकारणात फारसे सक्रिय नसताना त्यांच्यावर मुंबईमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चचा विषय बनले आहे. स्थानिक पोलिसांनी या विषयात बोलण्यास देण्यास नकार दिला आहे.

प्रफुल्ल लोढा परिचय

प्रफुल्ल लोढा हे एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होता. पण नंतर प्रफुल्ल लोढा त्यांनी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांनी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसात लोढाकडून माघार घेण्यात आली होती. कथित समाजसेवक आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या विरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Embed widget