एक्स्प्लोर
बापट साहेब कुणीही रागवणार नाही, परत या, पुण्यात पोस्टरबाजी

पुणे : पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर काँग्रेसकडून गिरीश बापटांविरोधात पोस्टर लावण्यात आले आहे. ‘कचऱ्याचा प्रश्न मिटला असून, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत’ अशा आशयाचे हे पोस्टर आहे. पोस्टरवर काय लिहिले आहे? “प्रिय बापट साहेब तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. कोणीही रागवणार नाही. कचऱ्याचा प्रश्न मिटला आहे. आम्ही तुमची आतुरतेनं वाट पाहात आहेत. महापौर आले. तुम्ही पण या!”
काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उद्देशून हे हटके पोस्टर लावले आहे. पुणे शहरात एकूण चार ठिकाणी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे भाजपकडून अद्याप या पोस्टरबाजीवर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. तब्बल 23 दिवसांनंतर पुण्याची कचराकोंडी फुटली. फुरसुंगीतील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी झाली होती. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर आज फुरसुंगीकरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. पुण्यातील कचरा टाकू देणार नाही ही भूमिका घेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं. 23 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही फुरसुंगी ग्रामस्थांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला होता. तसंच हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन छेडू, प्रसंगी राजीनामे देऊ अशीही भूमिका घेतली होती. मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन एक महिन्याचा अवधी मागितला. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगी ग्रामस्थांनी आपलं 23 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं. लवकरच महापालिका आणि राज्य सरकार दीर्घकालीन आराखडा बनवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं?
काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उद्देशून हे हटके पोस्टर लावले आहे. पुणे शहरात एकूण चार ठिकाणी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे भाजपकडून अद्याप या पोस्टरबाजीवर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. तब्बल 23 दिवसांनंतर पुण्याची कचराकोंडी फुटली. फुरसुंगीतील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी झाली होती. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर आज फुरसुंगीकरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. पुण्यातील कचरा टाकू देणार नाही ही भूमिका घेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं. 23 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही फुरसुंगी ग्रामस्थांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला होता. तसंच हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन छेडू, प्रसंगी राजीनामे देऊ अशीही भूमिका घेतली होती. मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन एक महिन्याचा अवधी मागितला. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगी ग्रामस्थांनी आपलं 23 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं. लवकरच महापालिका आणि राज्य सरकार दीर्घकालीन आराखडा बनवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं? - एक महिन्याचा अवधी
- एका महिन्यात कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्लॅन बनवणार
- ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी चर्चा करु
- पुण्यातला कचरा विकेंद्रीत पद्धतीनं कसा जिरवता येईल याचा प्लॅन बनवणार
- नवीन तंत्रज्ञानातून कचऱ्यावर प्रक्रिया करणार
- यासाठी बृहत प्लॅन आखणार
- फुरसुंगीतून जमिनीच्या कॅपिंगचाही विचार करणार
- एका महिन्यात बाबी मांडणार
- नोकऱ्यांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नोकरी देणार
- नुकसानभरपाई कशी देता येईल याचाही विचार
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























