एक्स्प्लोर

GBS Patient in Pune : एकाच दिवसांत GBS चे 10 रुग्ण वाढले, पुणेकरांची चिंता वाढली; 18 पेशंट व्हेंटिलेटरवर

GBS Patient in Pune : एकाच दिवसांत GBS चे 10 रुग्ण वाढले, पुणेकरांची चिंता वाढली; 18 पेशंट व्हेंटिलेटरवर

GBS Patient in Pune : GBS या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढलीये. जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज एकाच पुण्यात दिवसात जीबीएसचे 10 रुग्ण वाढ झालीये. सध्या पुण्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 140 वर पोहोचलीये. यातील 18 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात 3 रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झालाय. तर सोलापूरातही एकाने जीव गमावलाय. 

पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंखेचा आलेख वाढताच-

एकाच दिवसात १० रुग्णांची वाढ 

रुग्णांची एकूण संख्या १४० वर

१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे

९८ रुग्णांची जीबीएसचे रुग्ण म्हणून निश्चिती झाली आहे

२६ रुग्ण पुणे मनपा 
७८ रुग्ण (सिंहगड रोड, नांदेड गाव, किरकिटवाडी )
१५ पिंपरी चिंचवड 
१० पुणे ग्रामीण

पुण्यात जीबीएस बाधित रुग्णाचा तीन जणांचा मृ्त्यू झालाय. यामध्ये नांदेडगाव परिसरातील 65 वर्षीय नागरिकाचा देखील समावेश आहे. या रूग्णावरती मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस  (Guillain Barre Syndrome) बाधित आहेत, त्यातील हा एक रुग्ण होता. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या जीबीएस  (Guillain Barre Syndrome) बाधित रुग्णाचा मृत्यू झाला झाल्याने आता चिंता वाढली आहे. तर पुणे शहरामध्ये नांदेडगाव, सिंहगड रस्ता परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जीबीएस  (Guillain Barre Syndrome) बाधित रूग्ण आढळून आले आहेत. 

पुणेसोलापूर, कोल्हापूर, सांगलीनंतर आता साताऱ्यात सुद्धा जीबीएसचा शिरकाव झाला आहे. सातारसह कराडमध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर दोन रुग्ण साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर एक रुग्ण कराडमध्ये उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे..

जीबीएस रोग म्हणजे काय?

GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो लक्ष द्या! तब्बल 30 तास पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या तुमच्या विभागात काय स्थिती असणार?

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Pune Traffic Update: पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget