एक्स्प्लोर
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळं पुण्यात कचराकोंडी; चार दिवसांपासून कचरा सोसायट्यांमध्ये पडून
अर्थसंकल्पात 600 कोटींची तरतूद करुनही पुण्यात कचराकोंडी निर्माण झालीय. फुरसुंगीच्या रहिवाशांचं आंदोलन कायम असून प्रकरण गळ्याशी येताच पालिकेकडून कंत्राटाची घाई करण्यात येते आहे.
पुणे : पुण्यातला कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी 5 दिवसांपासून कचरा डेपो बंद केलाय. भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला 23 कोटी 45 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. मात्र, कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती साधनं नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. परिणामी पुणेकरांना पुन्हा एकदा कचराकोंडीचा सामना करावा लागतोय.
उरळी आणि फुरसुंगीकरांनी कचरा टाकू देण्यास मनाई केलीय. त्यामुळं गेल्या पाच दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळं अनेक सोसायट्यांमध्ये कचरा तसाच पडून आहे. पुणेकर दररोज दोन हजार टन कचरा करतात, त्यापैकी फक्त 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. दुसरीकडं कचरा डेपोमुळं होणारं प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे आजार आणि डासांची पैदास यामुळं उरळी आणि फुरसुंगीकर हैराण आहेत. दरम्यान, पालिका प्रशासननं ग्रामस्थांकडे 10 एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे.
मुंबईतला कचरा साफ करण्यासाठी राबवणार इंदौर मॉडेल
महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका -
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळं पुणेकरांची पुन्हा एकदा कचराकोंडी झालीय. पुण्यातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी 5 दिवसांपासून कचरा डेपो बंद केलाय. त्यामुळं पुण्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा होऊ लागलेत. प्रकरण गळ्यापर्यंत आल्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या कंपनीला कंत्राट दिलंय. भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला 23 कोटी 45 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. 2015 मध्ये देखील याच कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती साधनं नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. विशेष म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं 600 कोटींची तरतूद केलीय. तरीदेखील पुण्यात कचऱ्याचा प्रश्न निकाली लागत नाहीय.
मुंबईकरांवर 'कचरा टॅक्स'; घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यासाठी पैसे मोजावे लागणार
अन् रखडलेल्या कचरा प्रकल्पांच्या निविदांना पाय फुटले -
पुण्यात सोमवारपासून कचरा कोंडीला सुरुवात झाली आणि त्याचवेळी महापालिकेत अनेक महिने रखडलेल्या कचरा प्रकल्पांच्या निविदांना पाय फुटले. उरळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये आंदोलन सुरू असतानाच इकडे पुणे पाहापालिकेत गुरुवारी भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला उरळी देवाची इथं प्रकल्प सुरू करण्यासाठी 23 कोटी 45 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. त्याचबरोबर कचरा उचलण्यासाठी प्रत्येक टनांमागे 502 रुपये देण्याचंही ठरलं. एवढंच नाही तर या रकमेमध्ये प्रत्येक वर्षी साडेआठ टक्के वाढ करण्यालाही महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. कचरा कोंडीमुळे पुण्यात गंभीर समस्या उध्दभवलीय असं सांगत मागील सात महिन्यांपासून रखडलेल्या निविदेला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, तरीही पुण्याचा कचरा प्रश्न काही सुटत नाहीय.
Pune waste Issue | या कचऱ्याचं करायचं काय? 5 दिवसांपासून पुणेकरांची कचराकोंडी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement