एक्स्प्लोर

सोवळं मोडल्यानं स्वंयपाकी महिलेवर गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुण्यात घडला आहे.

पुणे : ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुण्यात घडला आहे. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची नेमकी तक्रार कशी नोंदवून घ्यायची याबाबत पोलिसांना देखील प्रश्न पडला होता. त्यांनी मेधा खोले यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही मेधा खोले या तक्रार नोंदवून घेण्यासाठी अडून बसल्या. अखेर पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. नेमकं प्रकरण काय? मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचं काम दिलं. नुकताच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. पण काल (बुधवार) निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती खोले यांना समजली. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. त्यावेळी आपलं नाव निर्मला यादव असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला. यावेळी आपल्याला महिलेनं दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget