Ladki Bahin Yojana : बहिणींची धास्ती वाढली अर्ज करून लाडकी बहीण योजनेचे पैसे नाकारले, निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार?
Ladki Bahin Yojana : निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार का? याबाबत राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पिंपरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार का? याबाबत राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलांनी स्वतःहून अर्ज करून मिळालेला लाभ नाकारत आहेत. जानेवारी 2025 पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे 10 दहा हजार 500 रुपये अनुदान पिंपरी चिंचवड शहरातील 3 लाख 89 हजार 920 महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा (Ladki Bahin Yojana)लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत.
1500 पुन्हा झाले जमा
जानेवारी महिन्याचा हफ्ता काही दिवसांपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांवर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
कोण होणार अपात्र?
शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुलनेने अधिक आहे, अशा महिला लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana)योजनेतून अपात्र ठरू शकतात.
लाभ सोडण्यासाठी कुठे आणि कसा कराल अर्ज?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, शहरातील काही महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) मिळणारा आर्थिक लाभसोडण्यासाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, त्याचा एकूण आकडा महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
