आयटी हबच्या वाहतूक कोंडीतून चुटकीसरशी सुटका! महिन्याकाठी अवघ्या 20 रुपयांचा खर्च, आर्य कुमारची अनोखी शक्कल
Pune Traffic : हिंजवडीतील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी एका आयटी अभियंत्याने एक शक्कल लढवली आहे. हीशक्कल नेमकी काय आहे, ते जाणून घ्या.
पिंपरी-चिंचवड : पुण्याची वाहतूक कोंडी (Pune Traffic) ही जगात चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच आयटी हब हिंजवडीत (IT Hub Hinjawadi) यायचं म्हटलं की, आयटीयंसना धडकीच भरते. मात्र याच हिंजवडीतील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी एका आयटी अभियंत्याने एक शक्कल लढवली आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या तरी तो त्या बाजूने चुटकीसरशी पुढं निघून जातो. यामुळं त्याच्या वेळेची बचत तर होतेच, शिवाय पर्यावरणाचे रक्षण ही होते.
पुण्याच्या वाहतूक कोंडीतून चुटकीसरशी सुटका!
या आयटी अभियंत्याला आता रोज येऊन जाऊन म्हणजे 24 किलोमीटर प्रवासासाठी महिन्याकाठी अवघ्या वीस रुपयांचा खर्च येतो. तुम्ही म्हणाल ही तर अतिशयोक्ती झाली. पण आर्य कुमार या आयटी अभियंत्याने कल्पनाशक्तीला वाव देत हे सत्यात उतरवलं आहे. आर्यने वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी नेमकी काय शक्कल लढवली आहे, ते जाणून घ्या.
महिन्याकाठी अवघ्या 20 रुपयांचा खर्च
देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या घरात पोहचली आहे, या वाढत्या लोकसंख्या पाहता सरकार आणि प्रशासन नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यात अपयशी ठरतं, हे आपण अनेकदा पाहिलंय. अशा प्रसंगी आपण स्वतःच्या समस्या सोडवू शकतो का? तर याचं उत्तर, होय असंच आहे. यासाठी फक्त कल्पनाशक्तीला वाव द्यावा लागतो. पुण्यातील आयटी अभियंत्याने अशीच एक शक्कल लढवली आहे आणि त्याने स्वतःची समस्या सोडवलेली आहे. आता हा आयटी अभियंता नेमका कोण आहे आणि त्याने स्वतःची समस्या कशी सोडवली आहे.
आयटी अभियंता आर्य कुमारची अनोखी शक्कल
वाहतुकीच्या कोंडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी आर्य कुमारने या ई-स्कुटरचा अवलंब केला. पण भारतात केवळ वाहतुकीची समस्या नाही, तर अनेक समस्या आहेत. त्या समस्यांमधून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा आर्य कुमारप्रमाणे कल्पनाशक्तीला वाव देऊ शकता आणि स्वतःची त्यातून सुटका करून घेऊ शकता. पण त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची.
महत्त्वाच्या इतर बातम्या :