एक्स्प्लोर
पिंपरीत स्विमिंग पूलमध्ये बुडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवडमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून एका इंजिनीअर तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. भार्गव गट्टूपल्ली असं या तरुणाचं नाव आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून एका इंजिनीअर तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. भार्गव गट्टूपल्ली असं या तरुणाचं नाव आहे.
वाकडच्या सिल्वर स्पोर्ट्स क्लबमध्ये काल (शुक्रवार) रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. मूळचा आंध्रप्रदेशचा भार्गव हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कामाला होता. गेली महिनाभर तो सिल्वर स्पोर्ट्स क्लबमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता.
दोनच दिवसापूर्वी हे प्रशिक्षण संपवून काल तो स्वतः पोहण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो अचानक बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तीन ते चार जीवरक्षक आणि इतर पोहणारे ही तिथं उपस्थित असतानाही त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी सिल्वर स्पोटर्स क्लबने व्यवस्थापन आणि जीवरक्षकांविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
क्रीडा
करमणूक
Advertisement