एक्स्प्लोर

Eknath Shinde In Pune: एकनाथ शिंदेंची पश्चिम महाराष्ट्रातली पहिलीच सभा सासवडमध्ये; राजकीय चर्चेला उधाण

या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.

Eknath Shinde In Pune: महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde)  हे 2 ऑगस्ट पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर (purandhar ) तालुक्याच्या सासवड होणार आहे. पवारांच्या बालेकिल्यात पहिली सभा होणार असल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे. 

बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या जाणू घेणार आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न देखील महत्वाचा असणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघात ही सभा असल्याने सभेची चांगलीच चर्चा होत आहे. 

या सभेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित असणार आहे. काय झाडी, काय डोंगर.., काय हाटील! एकदम ओक्केमध्ये..! त्याचा हा डायलॉग चांगलाच गाजल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी रोखठोक भाषणं केली. आता मात्र सासवडमध्ये पवारांच्या बालेकिल्ल्यात येवून ते नेमकं कोणावर निशाणा साधणार आणि कोणता नवा डायलॉग बोलणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सभेनंतर ते पुण्यात फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेते पुणे दौऱ्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतात. सत्तेसाठी साकडं घालतात. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय साकडं घालणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे जिल्हातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून नवे पद देण्यात आले आहेत. किरण साळी, विजय शिवतारेरमेश कोंडे, अजय भोसले, नाना भानगिरे या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना सचिवपदी नियुक्ती केली. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जागी आता किरण साळी यांची युवासेना राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्याने या सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report | Waah Ustad | Taufiq Qureshi | उस्ताद झाकीर हुसैन यांना तालवाद्यातून आदरांजली, तालाचा नाद, उपस्थितांची दादSpecial Report Massajog Suresh Dhas Visit | न्यायाची प्रतीक्षा, आरोपींची बडदास्तSpecial Report Modi-Sharad Pawar : 'गुरु-शिष्य' भेटले कुणाकुणाला खटकले? आधार, आदर आणि आदर्शABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Embed widget