एक्स्प्लोर

Eknath Khadse : प्रांजल खेवलकरांवर एकही गुन्हा नव्हता, कोणाच्यातरी सांगण्यावरुन त्यांना गोवलं गेलं, राजकारण किती खालच्या थराला गेलंय याचं उत्तम उदाहरण : एकनाथ खडसे

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह सर्वांना जामीन मिळाल्याचं म्हटलं. प्रांजल खेवलकर यांना खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आलं होतं. खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे असे दावे करत त्यांना पहिला आरोपी करण्यात आलं. कुणाच्यातरी सांगण्यावरुन कोणीतरी खेवलकर यांना अडकवल्याचा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागातील एका खोलीत पार्टी करत असताना पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. प्रांजल खेलवरकर यांच्यासह इतरांना 7 जणांना अटक करण्यात आली होती. खेवलकर यांच्यासह इतरांना जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्याचं राजकारण किती खालच्या थरावर गेलंय, याचं उत्तम उदाहरण आहे, असं म्हटलंय. 

Eknath Khadse on Pranjal Khewalkar Bail : प्रांजल खेवलकर यांच्या जामीनावर एकनाथ खडसे काय म्हणाले? 

प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ते उद्या तुरुंगाबाहेर येऊ शकतात. एकनाथ खडसे यांनी जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळताच प्रतिक्रिया दिली आहे. प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.  या प्रकरणात आज प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य जणांना जामीन मिळाला आहे. त्यांनी कुठलंही ड्रग्ज सेवन केलेलं नव्हतं किंवा बाळगलं नव्हतं तरी त्यांना खोट्या आरोपाखाली रेव्ह पार्टी केली म्हणून सांगितले गेलं. 

प्रत्यक्ष चार ते पाच जण एका घरात पार्टी करत होते ती रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत असा दावा केला गेला. त्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी केलं मात्र प्रांजल खेवलकर यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा नव्हता. कोणीतरी कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात आला आहे. 

प्रांजल खेवलकर यांना आता जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयात होणाऱ्या खटल्यात प्रांजल खेवलकर निर्दोष सुटतील, असा माझा विश्वास असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या थरावर गेलेला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे, असंही खडसे म्हणाले.

प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासह इतर काही जण पुण्यातील खराडी भागातील एका खोलीत पार्टी करत होते. त्याचवेळी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई  27 जुलै रोजी करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
Pune MPSC Student Death : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेशनं संपवलं जीवन; शेवटची चिट्ठी नाही तर सापडल्या फक्त उसने पैसे घेतल्याच्या नोंदी
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेशनं संपवलं जीवन; शेवटची चिट्ठी नाही तर सापडल्या फक्त उसने पैसे घेतल्याच्या नोंदी

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
Embed widget