एक्स्प्लोर
पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला 'विराट कोहली'
पुण्यात शिरुर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला चक्क विराट कोहलीच्या ड्युप्लिकेटला उतरवण्यात आलं आहे.
पुणे : निवडणुकीच्या मैदानात उभं राहिल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पुण्यात चक्क विराट कोहलीच्या ड्युप्लिकेटला प्रचारात उतरवण्यात आलं आहे.
पुण्यातील शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलचा प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या पोस्टरवर प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणून खऱ्याखुऱ्या विराट कोहलीचं नाव आणि फोटो आहे. त्यामुळे सगळेच जण चक्रावून गेले होते.
आता, ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement