Pune Accident : आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची मागणी, बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात दाद मागणार; पुणे अपघातावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadanvis On Pune Accident : आरोपी मुलाच्या वडिलांविरोधात कारवाई केली आहे, तसेच ज्यांनी दारू सर्व्ह केली त्यांच्याविरोधातही कारवाई केल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पुणे: पुण्यातील अपघात झाला तो अत्यंत गंभीर असून यामध्ये 304 कलमानुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे, तसेच मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. आरोपी हा अल्पवयीन असला तरी त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी पोलिसांची आहे. त्यामुळे बालहक्क मंडळाच्या (Juvenile Justice Board) आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचंही ते म्हणाले. आरोपीची रिमांड मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही फडणवीसांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात येऊत तातडीने पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पुणे अपघातात आतापर्यंत काय कायदेशीर पाऊलं उचलली याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आरोपीवर 304 कलम
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीसांनी अपघात प्रकरणात योग्य ती कारवाई केली आहे. पुण्यातील अपघात गंभीर आहे. पोलीसांनी कारवाई करत ज्युविनाईल जस्टिसकडे 304 कलम मेंशन केलं आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे. त्यामुळे त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी बालहक्क मंडळाकडे करण्यात आली आहे. यापुढची कारवाईदेखील बालहक्क मंडळाच्या सूचनेप्रमाणे करण्यात येईल.
मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे कारवाई केली आहे. मात्र ज्युनिनाईट जस्टिस बोर्डाच्या भुमिकेमुळे आश्चर्य वाटतं. ज्यांनी दारू सर्व्ह केलीय त्यांच्यावरही कारवाई केली. मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला पोलीसांनी गंभीरपणे घेतलंय. यात न्याय मिळेलच.
ड्रंक अँड ड्राईव्हवर कडक कारवाई करणार
यात काही प्रश्न उभे राहिलेत. रेसिडेन्शील पबवर प्रश्नचिन्ह उभा राहतोय. इथे मुलाचं वय पाहिलं जात नाही. पोलीसांसोबत चर्चा झाली असून मोठ्या प्रमाणावर आता ड्रंक अँड ड्राईव्ह संबंधित पोलीस योग्य कारवाई करणार आहेत. ज्यांना लायसन्स मिळाली आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. महापालिकेलाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. एफएलसीचं नवीन लायसन्स देताना नोंद घेतली जाईल. रहिवाशी भागात हे नसावं यावर लक्ष राहील.
ज्युव्हिनाईल जस्टिस अंतर्गत पालकावर पहिली कारवाई केली जातेय, हे पालकांनी लक्षात ठेवावं. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असं पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा हिनियस क्राईम आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ही बातमी वाचा: