एक्स्प्लोर

Ajit Pawar: दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार

Ajit Pawar: आज दीपक मानकर अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. अजित पवार येण्याआधीच दीपक मानकर पक्ष कार्यालयात आले आहेत. त्यानंतर रुपाली ठोंबरे देखील आज पक्ष कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार आहेत.

पुणे: राज्यात निवडणुका जाहीर होण्याआधी आणि आचारसंहिता लागण्याआधी राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये संधी दिली गेली नसल्याने अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच संधी न दिल्याने विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच अजित पवार गटामध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या पुणे शहरातील 600 पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. आज देखील हे राजीनामा सत्र सुरू असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर पक्षात संधी न मिळाल्याने नाराज असलेले दिपक मानकर आणि पक्षातील इतर महिलांना संधी न देता वारंवार रूपाली चाकणकरांना संधी देतात म्हणून बोलणाऱ्या रूपाली ठोंबरे आज अजित पवारांची भेट घेणार आहेत. 

विधान परिषदेवर संधी न दिल्याने दिपक मानकर नाराज 

दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला होता. त्यानंतर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी मागील 40 वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात कार्य करत आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदं भूषवली आणि पदांना न्याय देण्याच काम केलं . गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लोकसभेवेळी देखील त्यांनी मोठी मेहनत केल्याचे सांगितले. तर रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात आली त्याबाबत देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

या प्रकरणावरून आता अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आज दीपक मानकर अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. अजित पवार येण्याआधीच दीपक मानकर पक्ष कार्यालयात आले आहेत. त्यानंतर रुपाली ठोंबरे देखील आज पक्ष कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार आहेत. मानकर यांच्या कार्यकर्त्यांनी मानकरांना विधान परिषद मिळाली नाही म्हणून राजीनामा सत्र सुरू केलं आहे. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना सातत्यानं पक्षात पद दिली जात आहेत म्हणून रूपाली ठोंबरे यांनी पक्षावरच टीकेची झोड उठवली आहे. याबाबत आज दोन्ही नेते अजित पवारांची पक्ष कार्यालयात भेट घेत आहेत. 

ऐन विधासभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली नाराजी आणि राजीनामा सत्र यामुळे पुन्हा एकदा पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशातच रूपाली चाकणकर यांना दिली जाणारी पदे आणि जबाबदाऱ्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी देखील यावेळी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच निवडणुकीआधी सुरू झालेलं हे नाराजीनाट्य पक्षाची डोकेदुखी ठरू शकतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केलाCity 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP MajhaDevendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाहीABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget