Coronavirus | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 216 वर, राज्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू
संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. महाराष्ट्काच कोरोना बाधितांचा आकडा 200 पार गेला आहे.
पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून एका 52 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार सुरू होते. सदर व्यक्ती आधीपासूनच फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासलेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केलेला नव्हता. तसे परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात ही व्यक्ती आलेली नव्हती. हा पुण्यातील कोरोनाचा पहिला बळी आहे. तर मुंबईत एका ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या 10 वर गेली आहे.
सदर व्यक्तीला 21 मार्च रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. या कोरोना बाधित व्यक्तीला उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काल राज्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. एका 40 वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचं आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला तो मधुमेही होता.
राज्यातील संख्या -
मुंबई – 88 पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – 42 सांगली – 25 मुंबई एमएमआर – 24 नागपूर – 16 यवतमाळ – 4 अहमदनगर – 5 सातारा - 2 कोल्हापूर – 3 औरंगाबाद - 1 रत्नागिरी -1 सिंधुदुर्ग -1 कोल्हापूर -1 गोंदिया - 1 जळगाव - 1 बुलढाणा – 1 एकूण - 216पाहा व्हिडीओ : सरकारच्या सूचनाचं पालन न केल्यास पुढच्या पिढीला याची किंमत मोजावी लागेल : शरद पवार
महाराष्ट्रात एकूण 216 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रानंतर केरळमध्ये 16, उत्तरप्रदेशमध्ये 11, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 5, दिल्लीमध्ये 6, तमिळनाडूत 4, लडाखमध्ये तीन, राजस्थानमध्ये तीन, हिमाचल प्रदेशमध्ये दोन, उत्तराखंडमध्ये 2, तेलंगणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आंध्रप्रदेशमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून महाराष्ट्रात मृत्यू झालेल्यांची संख्या 9 आहे. त्यानंतर गुजरातमध्ये पाच, कर्नाटकात तीन, मध्यप्रदेश आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, जम्मू-काश्मिर, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच
Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड