एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवडमध्ये पाच चिमुरड्यांची कोरोना विषाणूवर मात; सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना विषाणूच्या नकारात्मक वातावरणात पिंपरी चिंचवडमधून सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. येथील पाच बालकांनी कोरोना विषाणूशी लढा देत, ही लढाई जिंकली आहे.

पिंपरी चिंचवड : शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने सर्वांच्याच चिंतेत भर पडत आहे. असे असताना सर्वांचं मनोधैर्य वाढवणारी एक बातमी हाती आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना पिंपरी चिंचवड शहरातील 2 ते 12 वर्षे वयोगटातील सात बालकांनी कोरोनावर मात केली आहे.

आज दोन मे 2020 रोजी यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले. 16 व 17 एप्रिल रोजी ही सात कोरोनाग्रस्त बालके वायसीएम रूग्णालयातील बालरोग विभागात दाखल झाली होती. या बालकांना वेळोवेळी सर्व उपचार देवून 14 दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले. यापैकी दोन बालकांवर कोरोनाचे उपचार चालू असताना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण 30,000 व 66,000 हजार असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते. सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण दीड लाखांच्या वर असते. त्यासाठी या बालकांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेट्स (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले.

Matoshree | 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

सर्वांची कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक

बालरोग अतिदक्षता विभागात या सर्वांना त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते. माता व बालकांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले. बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगीरी करता आली. बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाला आहे.

गाव दिसलं अन् तिला अश्रू अनावर झाले; 15 वर्षीय मुलीचा पुणे-मुंबई रेल्वे रुळावरुन पायी प्रवास

पुणे विभागातील 410 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पुणे विभागातील 410 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 87 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 566 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget