एक्स्प्लोर
रोहित टिळकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला धमकी
काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेनं आता आणखी एक तक्रार पोलिसात केली आहे.

पुणे : काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं आता पुणे पोलिसात नवी तक्रार दाखल केली आहे. रोहित टिळकांवरील तक्रार मागे न घेतल्यास अॅसिड हल्ला करण्यात येईल. अशी धमकी पीडित महिलेला देण्यात आल्याची माहिती समजतं आहे. रोहित टिळकांविरोधातील तक्रार मागे न घेतल्यास अॅसिड हल्ला करु अशी दोन लोकांनी धमकी दिली असल्याची तक्रार पीडित महिलेनं विश्रामबाग पोलिसात केली आहे. 17 जुलैला रोहित टिळकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रोहित टिळकांना 28 जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण : रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. पीडित महिला आणि रोहित टिळक यांची दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि मारहाण केल्याचं पीडित महिलेनं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. रोहित टिळक यांनी २००९ आणि २०१४ साली गिरीश बापट यांच्याविरुध्द कसबा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. संबंधित बातम्या : पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
आणखी वाचा























