Eknath Shinde: 'सरकारचे अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले... ', CM शिंदेंच्या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये पिकला हशा, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर
Eknath Shinde: एका दिवसात कोणतीही योजना सुरू होत नाही. एका महिन्यात तयार होत नाही. तर त्याचा बऱ्याच गोष्टीची तयारी करावी लागते, त्यासाठी खूप काळ लागतो, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या योजनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे, यावर आज बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, हे सरकार सामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकरांचं आहे हे सर्वांचं हे सरकार आहे, गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. अनेक छोटे मोठे निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली. मात्र, अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेलेत. शिंदेंच्या या वक्तव्यनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. एका दिवसात कोणतीही योजना सुरू होत नाही. एका महिन्यात तयार होत नाही. तर त्याचा बऱ्याच गोष्टीची तयारी करावी लागते, त्यासाठी खूप काळ लागतो, असं मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणालेत.
या योजनेतून मिळणाऱ्या पैशावर कोणी काहीही बोललं, दीड हजारात विकत घेता का, लाच देता का? असे अनेक प्रश्न विचारले, मात्रमी इतकंच सांगतो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे. शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांचा 93 वा अभिष्टचिंतन सोहळा आळंदीत पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
लाडकी बहिणीला आपण एसटीचे पन्नास टक्के तिकीट केलं, त्यामुळं बहीण भावजींना म्हणते आता तुम्ही घरीच बसा, मी बाजार करून येते. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असं बोललं गेलं. पण मी म्हणालो बघा तरी काय होतं ते, पण आज हीच एसटी फायद्यात आली आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेवर आरोप करणाऱ्यांना एसटी पन्नास तिकीट योजनेद्वारे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उत्तर दिलं आहे.
शेतकऱ्यांनी गारपिट, अवकाळी पाऊस यामुळे पिकांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना १६ हजाक कोटी रूपये नुकसान भरपाई दिली, शेतकऱ्यांना केंद्राकडून ६ हजार मिळतात, त्यांना राज्य सरकारकडून ६ हजार आमच्या शेतकऱ्यांना दिले जातात, अशी माहिती शिंदेंनी यावेळी दिली. त्याचबरोबर इतर योजनांबद्दल देखील शिंदेंनी (Eknath Shinde) यावेळी बोलताना सांगितलं आहे.
योजनांवर विरोधकांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उत्तर देताना म्हणाले, आयुष्यात कधी खोटं बोलला नाही, कधी ही फसवणार नाही. मात्र सरकारने आलेल्या योजना फसव्या असल्याच्या अफवा उठवल्या जातायेत. माझ्याकडे येणारा एक ही व्यक्ती खाली हाती जाणार नाही, एवढी मोठी शक्ती मला द्यावी असं मागणं मी परमेश्वराकडे करतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.