(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच, बावनकुळेंचा विश्वास, 2024 ला भाजपचं महाराष्ट्रात 45 प्लस
2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं.
Chandrashekhar Bawankule : 2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. 2024 ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha constituency) याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व गुरू आहेत. 155 देशांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. बाकी लोकांना पॉलिटिकल व्हिजन आहे. पंरतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे व्हिजन घेऊन चालले असल्याचे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने गरीब कल्याणकारी योजनांना ब्रेक लावला होता, असेही बावनकुळे म्हणाले. पुढच्या काळात मी राज्याचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रात 45 प्लस लोकसभा आणि 200 प्लस विधानसभा हे सूत्र आम्ही ठरवल्याचे बावनकुळेंनी सांगितले.
सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पूर्णवेळ बाकामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यात सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. प्रत्येक वेळी त्या तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणची विकासाची काय स्थिती आहे. केंद्राकडून काय विकासाची अपेक्षा आहे, राज्य सरकारकडून या ठिकाणी काय करता येईल याचा आढावा त्या घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. गरिब कल्याणाच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचा देखील सीतारमण आढावा घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
शिवसेना भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात चांगला प्रदर्शन करेल असे बावनकुळे म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा बारामतीसहीत 400 जागा जिंकू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: