एक्स्प्लोर
गाडीला जॅमर लावल्याने भाजप नगरसेवकाचा संताप, पोलिसांना दमदाटी

पुणे : गाडी नो पार्किंगमध्ये उभी असताना पोलिसांनी जॅमर लावल्याने पुण्यातील भाजप नगरसेवक चांगलेच संतापले. बाणेर बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल बालवडकर यांनी जेएम रोड येथे गाडी नो पार्कींगमध्ये उभी केली होती. वाहतूक पोलीसांनी गाडीला जॅमर लावल्याने अमोल बालवडकर यांनी पीआय शंकर ढामसे यांना दमदाटी केली.
दमदाटी केल्यानंतर वरिष्ठ पोलिसांना फोन करून पीआय ढामसे यांनी दारू पिऊन माझ्या गाडीवर कारवाई केल्याचंही अमोल बालवडकर यांच्याकडून सांगण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी रात्री उशीरा शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 353 अंतर्गत अमोल बालवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement



















