एक्स्प्लोर
हॉर्न वाजवल्याचं कारण, दुचाकीस्वारांची कारचालकाला दगडाने मारहाण
दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग केला आणि गाडी अडवून कारचालकाला दगडाने मारहाण केली.

पिंपरी चिंचवड : हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कारचालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. दुचाकीस्वारांनी पाठलाग करुन कारचीही तोडफोड केली.
पिंपरीतील ताथवडे भागात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. कारने जात असताना गजानन वीरकर यांनी हॉर्न वाजवला. त्यावेळी 'हॉर्न का वाजवतो' अशी दमबाजी दुचाकीस्वारांनी केली. मात्र वाद टाळण्यासाठी वीरकर तसेच पुढे निघाले.
दुचाकीस्वारांनी वीरकरांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी अडवून त्यांना दगडाने मारहाण केली. इतकंच नाही, तर गजानन वीरकरांच्या कारच्या काचा फोडून आरोपींनी गाडीचं दारही चेपलं. यामध्ये वीरकर जखमी झाले आहेत.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीस्वारांना अटक केली आहे.
चारच दिवसांपूर्वी मोबाईल लुटण्यासाठी पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण झाली होती. हे पाहता शहरात पोलिसांचा धाक राहिला आहे का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
