एक्स्प्लोर
मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग, आगीत कार जळून खाक
पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर एका कारनं खंडाळा एक्झिट कॉर्नरजवळ अचानक पेट घेतला. काही वेळापूर्वीच ही घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरुन ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जात होती. मात्र, खंडाळा एक्झिट कॉर्नरजवळ येताच या कारनं अचानक पेट घेतला. मात्र, कारमधील लोकांना आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं ते तात्काळ कारमधून बाहेर पडले.
कारला आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महामार्गावरुन जाणाऱ्या इतर गाड्यांमधील प्रवाशांनी या कारची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement