एक्स्प्लोर

Pune Crime News: 20 लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण, पोलिसांनी 6 तासांत केली सुटका

20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात सुटका केली. ही घटना शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री घडली होती.

Pune Crime News: 20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात सुटका केली. ही घटना शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री घडली होती. सहा तासात सुटका करुन पिंपरी  पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी ज्ञानेश्वर किसन चव्हाण (23), लखन किसन चव्हाण (26) आणि लक्ष्मण डोंगरे (22) अशी अटक केलेल्यांची ओळख पटवली असून अपहरणप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील असून ते हिंजवडी परिसरात राहतात. मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या आणि पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
नेमकं काय घडलं?

2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांना 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा फोन आला. हिंजवडी फेज 2 येथील स्वराज पेट्रोल पंपाजवळून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्यात आले. त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी शिक्रापूरजवळ आरोपींचा तपास केला. ते अहमदनगरच्या दिशेने जात होते, मात्र त्यांची गाडी बिघडल्याने दुरुस्तीसाठी दिली होती. त्यांना अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन धारदार शस्त्रे, पाच मोबाईल फोन तसंच कार जप्त केली आहे.

आरोपी फिर्यादीचा स्टॉल होता. या स्टॉलवर हे दोघे मोफत खात असत. अनेकदा त्यांनी धमकी दिली होती. मात्र याकडे तक्रारदाराने दुर्लक्ष केलं. जेव्हा तिने पैशाची मागणी केली तेव्हा त्यांनी तिच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली. तिने यापूर्वी त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या दिवशीसुद्धा असंच घडलं. खाण्याचे पैसे मागितले असता. ते दोघे चिडले. आरडाओरड करु लागले. अनेकदा धमकी दिली होती मात्र अपहरण करतील असं तक्रारदाराला वाटलं नाही. मात्र शेवट त्या दोघांनी मुलाचं अपहरण केलं, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget