एक्स्प्लोर
पुण्याच्या दौंडमधील मिनाक्षी फेरो कंपनीत स्फोट, 10 जण जखमी
दौंड तालुक्यातल्या भांडगाव परिसरात असणाऱ्या मिनाक्षी फेरो कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

दौंड : दौंड तालुक्यातल्या भांडगाव परिसरात असणाऱ्या मिनाक्षी फेरो कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या स्फोटात जवळजवळ 8 ते 10 कामगार जखमी झाले आहेत. ही कंपनी पुणे-सोलापूर महामार्गापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर भांडगाव- खोर रस्त्यालगत आहे. आज सकाळच्या सुमारास अचानक या कंपनीत स्फोट झाला. मात्र, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या कंपनीमध्ये भंगारातलं लोखंड वितळवून त्यापासून पक्कं लोखंड बनवण्याचं काम चालतं. दरम्यान, या कंपनीत परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळते आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























