(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोची चौकशीची करा; भाजप नेते राम शिंदेंचं साखर आयुक्तांना पत्र
Baramati Argo : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची (Baramati Agro Factory ) चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची (Baramati Agro Factory ) चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे. राम शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आलीय.
15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. हा कारखाना 10 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच आज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या माणीचे निवेदन दिले आहे. राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हटले आहे राम शिंदे यांनी?
"या वर्षीचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्याचे शासनाचे आदेश डावलून नियमाचे उल्लंघन केले आणि आज 10 ऑक्टोबर 2022 रोजी बारामती ॲग्रो लि. शेटफळगडे (ता. इंदापूर जि. पुणे) कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांच्याकडे केली, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या