एक्स्प्लोर

अजितदादा आणि 'केबिन'...! 'त्या' यादगार प्रवासाचा राजेंद्र पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

'पवार' परिवारात एक नाव असं आहे राजकारणापासून दूर राहून शेतीत रमणारे राजेंद्र पवार यांची एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा आणि अजित पवारांचा भन्नाट किस्सा सांगितला.

मुंबई : राजकारणात पवार नाव घेताच आपल्यासमोर राजकारण उभं राहतं. मात्र या पवार परिवारात एक नाव असं आहे जे राजकारणापासून दूर आहे. ते म्हणजे राजेंद्र पवार.  शेतीत रमणारे राजेंद्र पवार यांची एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी शेती, माती, पिकं, बारामती पॅटर्न यासह शेतीतील नवनवीन प्रयोगांवर अनुभवांसह त्यांनी उदाहरणं दिली. यावेळी राजेंद्र पवारांनी अजित दादांचा एक भन्नाट किस्सा सांगितला. 

राजेंद्र पवारांनी सांगितलं की, मी अकरावीला होतो. अजित दादा दहावीला होते. त्यावेळी व्यवसाय करायचं ठरलं. त्यावेळी आम्ही गायी आणायला बंगळुरुजवळ एका ठिकाणी गायी मिळायच्या. त्यावेळी बजाज यांची ओळख होती. त्यांच्या स्कूटर घेऊन जाणाऱ्या मोठ्या गाड्या जायच्या. त्या गाड्या साऊथला जायच्या. येताना त्या गाड्या रिकाम्या यायच्या. मग त्यावेळी आम्ही दोघं मी आणि अजित दादा त्या गायी आणण्यासाठी गेलो. त्यावेळी तिथून यायला दोन तीन दिवस लागायचे. मग आम्ही दूध काढून वाटेत तीन रुपयांनी विकायचो. अजित दादा पाणी आणून द्यायचे,मी दूध काढायचो आणि मग ते विकायचो. त्यावेळी प्रवासात मी मागे बसलो होतो. अजित दादा पुढे केबिनमध्ये बसलो होते. आम्ही उतरलो त्यावेळी अजित दादांचे वडील माझ्या वडिलांना गमतीनं म्हणाले, तो माझा मुलगाय म्हणून केबिनमध्ये बसला आणि तो तुझा मुलगा आहे म्हणून तो गायींजवळ बसला. मी ही नेहमी म्हणतो की, अजित दादा केबिनमध्ये बसून तो तिथंच 'केबिन'मध्ये बसत राहिले, असं राजेंद्र पवार म्हणाले. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वाटा निवडतात. मला राजकारणाच्या वाटेवर कधी यावं वाटलं नाही. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही, असंही राजेंद्र पवार यांनी सांगितलं. 

'शेतकरी अडाणी राहिला तर शेती कशी परवडेल'

राजेंद्र पवार म्हणाले की, जो शेतकरी शेतीवर प्रेम करतो, तो यशस्वी होतो असं ते म्हणाले. आधी शिक्षणाप्रमाणं नोकऱ्या दिल्या जायच्या. काही न शिकलेल्या लोकांना शेतीच्या कामाला लावलं जायचं. पूर्वीसारखं आता चालत नाही. आता शेतीत बचत करणं फार गरजेचं आहे. जमिनीत काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. जमिन जीवंत आहे पण जमिनीशी कसं खेळायचं हे शिकणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी मायक्रो बायोलॉजी व्यवस्थित शिकवली जात नाही. शेतीसाठी आपल्याला बॉटनी जमली पाहिजे. शेतीला औषधं कोणती द्यायची यासाठी आपल्या केमिस्ट्री देखील कळली पाहिजे. आजचा शेतकरी अडाणी राहिला तर त्याला शेती कशी परवडेल. शिवाय त्याने त्यात कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय त्याला शेती परवडणार नाही, असं राजेंद्र पवार म्हणाले. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्वीकारायला पाहिजे. आपल्याकडं अर्धं स्वीकारतात, अर्ध स्वीकारलं जात नाही, असं राजेंद्र पवार म्हणाले. 
 
कृषिरत्न राजेंद्र पवारांना त्यांची कोणती ओळख आवडते? माझा कट्ट्यावर सांगितलं उत्तर 
यावेळी त्यांना आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव, शरद पवारांचे पुतणे, अजित पवार-सुप्रिया सुळे यांचे चुलतभाऊ की आमदार रोहित पवारांचे वडिल आणि शेतीमधील एक पंडित यांपैकी कुठली ओळख तुम्हाला आवडते? असा सवाल राजेंद्र पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, मी राजेंद्र पवार असल्याची ओळख मला आवडते. 

राजेंद्र पवार म्हणाले की, पुरस्कारासाठी आम्ही कुणीच काम करत नाहीत. पुरस्काराचं फार मोठं अवडंबर करत नाहीत. शेतीशी आमचा कायम संबंध आलेला आहे. मला आईमुळं शेतीची विशेष आवड लागली. आप्पासाहेबांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आमची आई वारली त्याच्या दुसऱ्या दिवशी 100 शेतकऱ्यांना घेऊन चितळ्यांकडे जायचं होतं. त्यावेळी वडिलांनी विचारलं तू जातो की मी जाऊ त्यावेळी मी त्यांना कसं म्हणणार तुम्ही जा. 36 तासही झाले नव्हते त्यावेळी मी 100 शेतकऱ्यांना घेऊन चितळेंकडे गेलो, असे आमच्यावर संस्कार आहेत, असा अनुभव राजेंद्र पवारांनी सांगितला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागतWari Loksabhechi Dharashiv EP 11 : ओमराजे की अर्चना पाटील? धाराशिवकर कुणाच्या मागे?CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
Konkona Sen Sharma :  10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
Embed widget