एक्स्प्लोर

BJP: भाजपमध्ये मोठं इनकमिंग; रांजणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ७२ गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा असलेल्या स्वाती पाचुंदकर पतीसह भाजपमध्ये

BJP: वसई विरार, पुणे, कोल्हापूर,सातारा, परभणी या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केले आहेत.

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये (BJP) जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. मुंबईतील भाजप (BJP) कार्यालयात विविध पक्षांतील नगरसेवकांनी अधिकृतपणे कमळ चिन्ह हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्यात मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला नवे बळ दिले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने पक्षविस्ताराच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. विविध पक्षांतील नाराज नेते आणि स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मोहीम राबवली जात असून, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा  (BJP) खेळ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.काल भाजपमध्ये मोठ्या संख्येने विविध पक्षातून पक्षप्रवेश झाले आहेत. वसई विरार, पुणे, कोल्हापूर,सातारा, परभणी या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. (BJP) 

incoming in BJP: पुण्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर भाजपमध्ये

यामध्ये पुण्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांनी सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल (मंगळवारी, ता 14) मुंबई प्रवेश केला. त्यांच्यासोबत पुण्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाटील दत्ता पाटील, राहुल पवार, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती पाचुंदकर यांनी त्यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मात्र स्वाती पाचुंदकर यांच्यावर सरपंच असताना ग्राम पंचायतीची ७२ गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात रांजणगाव ग्रामपंचायतीच्या लिपीक आणि ग्रामसेवकाला अटक देखील झाली होती. मात्र स्वाती पाचुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला आहे. स्वाती पाचुंदकर या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होत्या‌.

incoming in BJP: वैभव खेडेकर भाजपमध्ये दाखल, तीन वेळा रखडलेला पक्षप्रवेश पार पडला

भाजपमध्ये खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा झडत असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजप प्रवेश रखडल्याने खेडेकर स्वतः मुंबईत येऊन भाजप नेत्यांची भेट घेऊ लागले होते. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. पक्षप्रवेश कधी होणार, यावर प्रश्नचिन्ह कायम असतानाच आज अचानक त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला आहे. खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश हे केवळ वैयक्तिक राजकीय पुनरागमन नसून, कोकणात भाजपची घडी अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे विश्लेषण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने या प्रवेशाला महत्त्व दिलं जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget