एक्स्प्लोर

Pune Police : केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई 

मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पुणे : मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त (Pune Police) केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने (Pune Crime Branch) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक  कारखाना उद्धवस्त केला आहे. तेथून तब्बल दोन हजार तीनशे किलो (2300 KG) क्लोरल हायड्रेट  पावडर (Chemical) जप्त करण्यात आली  आहे . त्याची किंमत 60  लाख रुपयांच्या घरात आहे. तसेच तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सर्वात गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत  होता.

दोघांना बेड्या

पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी धडक कारवाई करण्याचं ठरवलं आणि थेट कारवाई केली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निलेश विलास बांगर (वय 40, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर ता आंबेगाव), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय 60, रा केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 

केमिकलचे 142 किलो 750 ग्रॅम वजनाचे 5 पोते जप्त

क्लोरल हायड्रेड हे विषापी बनावट ताडी बनवण्यासाठी वापरलं जातं. मुंढव्यतील आरोपी असलेल्या प्रल्हाद रंगनाथ भंडारी याच्याकडे क्लोरल हायड्रेड साठा पुणे पोलिसांना सापडला. याच प्रकरणाची सखोल चौकशी केली असता.  नीलेश बांगरने याने हा माल पुरवल्याचं समोर आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट घरावर छापा टाकत आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकीतून केमिकलचे 142 किलो 750 ग्रॅम वजनाचे 5 पोते असा 2 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त केला. 

पुणे क्राईम ब्रांचने वेल्हाळे गाठलं अन्...


पुणे पोलिसांनी  या प्रकरणाच्या खोलात जाऊन पर्दापाश करण्याता निर्णय घेतला आणि त्यात थेट केमिकल विषारी ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना सुरु केल्याचं समोर आलं. अहमदनगर जिल्ह्यातील सांगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने हा कारखाना सुरु केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पुणे क्राईम ब्रांचने वेल्हाळे गाठलं आणि छापा टाकला. यात  2,217 किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि क्लोरल हायड्रेड तयार करण्यासाठी लागणारे सगळे उपकरणं असा एकूण 60 लाख रुपयांचा माल जप्त केला आणि कारखानादेखील सिल केला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Shivaji Adhalrao Patil Join NCP : शिवसेना सोडली, मनगटावर घड्याळ, शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, शिरुरमध्ये पुन्हा अमोल कोल्हेंशी लढत!

 

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget