Baramati News : शरद पवारांची पहिली निवडणूक पाहणारे आजोबा आज कुणासह? दादा की काका?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीतली लढाई एकीकडे निष्ठूर होणार आहे तर दुसरीकडे तेवढीच भावनिकदेखील होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार आहे.
पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीतली लढाई एकीकडे (Baramati Loksabha Election 2024) निष्ठूर होणार आहे तर दुसरीकडे तेवढीच भावनिकदेखील होणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) अशी पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार आहे. बारामतीकर नेमके कोणासाठी भावनिक होणार आणि कोणासाठी निष्ठूर होणार?, हे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून अजित पवार हे बारामतीचं राजकारण हातळत आहेत. त्यामुळे तरुणांचा एक मोठा वर्ग अजित पवारांच्या पाठीशी आहे. मात्र शरद पवारांच्या राजकारणाचा प्रवास बारामतीतील वृद्धांनी पाहिला आहे. त्यातील वृद्धांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणतात, 1967 साली शरद पवार त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक पाहिली आहे. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलो होते. त्यामुळे शरद पवारांना आम्ही पहिल्या निवडणुकीपासून ओळखतो. मात्र आता पवार कुटुंबियांमध्ये फूट पडली आहे. तरीही आम्ही सगळे शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं बारामतीतील वृद्ध नागरिकांनी म्हटलं आहे. शरद पवारांनंतर आता आम्ही सु्प्रिया सुळेंच्या पाठिशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामतीकर म्हणातात, की जरी शरद पवार गटाकडे टीम कमी असली आणि काम करणारी लोकं कमी असली तरीही शेवटच्या क्षणी सगळे कार्यकर्ते आणि तरुण वर्गही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनाच मतदान करतील, असा दावाही केला आहे. राज्यात दडपशाहीचं राजकारण आहे. अनेक ठिकाणी मात्र दडपशाही चालत नाही. कितीही काहीही होऊ दे मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच मतदान करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामतील राजकारण करण्यासाठी आतापर्यंत अनेकांंनी प्रयत्न केले आहेत. मात्र कोणालाही बारामती काबिज करता आली नाही. कोणालाही सहज बारामती मिळत नाही. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते गोळा करत आहोत आणि शरद पवारांच्या पाठिमागे उभं राहणार आहोत, असंही बारामतीकर म्हणाले आहेत.
नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं होतं. यावरुन बारामतीकर मात्र चांंगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. ते म्हणाले की, बारामतीत येऊन शरद पवारांना डावलल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार जनतेसोबत बसून कार्यक्रम पार पाडतील, असं ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी देशासाठी मोठं काम केलं आहे. त्यामुळे त्यांची मुलगी म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करणार असल्याचं म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी-