एक्स्प्लोर

Baramati News : काका-पुतण्या एकाच मंचावर येणार! आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

Baramati News : नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या आज दौऱ्यावर येत आहेत.

Namo Rajgar Melava : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. या निमित्ताने काका-पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत. आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या आज दौऱ्यावर येत आहेत. नमो रोजगार मेळाव्याचे निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर असून त्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील आज उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या वाद झाला होता. मात्र, आता या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 

नमो रोजगार मेळावा

पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामती आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. पण या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला शरद पवारांना या कार्यक्रमाच्या निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने सारवासरव करत नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचंनाव नमूद केलं. त्यानंतर आता आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर

येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. 

बारामती बस स्थानक आणि पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन

या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे.

नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार

बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे, ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांना निमंत्रण मिळालं नसल्याने टोला लगावला होता. मात्र, शनिवारी दिलेल्या नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवाराचं नाव होतं.

आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत. तसेच, पाच जिल्ह्यातील युवक युवती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला तरी या कार्यक्रमात राजकीय भाषणं होणार आणि यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच जर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget